पिंपरी -किराणा दुकानदार सिगारेट विकत नसल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुकानाची तोडफोड केली. दुकानदाराच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे आठ वाजता बोपखेल येथे घडली.
लक्ष्मण गेवरजी भाटी (वय 42, रा. बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश उर्फ बबलू मारुती दिसले, तेजस खरात, तुषार डोंगरे, बबलू गुलाब घुले, तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.