VBA Punjabrao Dakh as Lok Sabha : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात सद्या अतिशय वेगवान घडामोडी होत आहेत. शिंदेंसेनेवर जाहीर उमेदवारी बदल्याची नामुष्की आली. त्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील परभणीत अचानक उमेदवार बदलण्यात आला आहे. वंचितने परभणी लोकसभा मतदारसंघात आपला जाहीर झालेल्या उमेदवारास रद्द करून त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील सादर केला आहे.
यापूर्वी वंचितने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. | VBA Punjabrao Dakh as Lok Sabha
आतापर्यंत 3 ठिकाणच्या उमेदवारीत बदल
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 19 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. | VBA Punjabrao Dakh as Lok Sabha
मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. | VBA Punjabrao Dakh as Lok Sabha
बच्चू कडूंना निनावी चिठ्ठीद्वारे धमकी ! केजरीवालांचा उल्लेख करत लिहिले..
भावना गवळींचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंची ग्वाही म्हणाले,”राजकारणात काही..”