आज 68 केंद्रांवर लसीकरण

पुणे  -करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत गुरुवारी 68 केंद्रांवर लसीचे डोस मिळणार आहेत. त्यामध्ये 15 केंद्रांवर कोवॅक्‍सिन, तर 53 केंद्रांवर कोविशील्डची लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून, ऑनलाइन बुकिंग करून अपॉइन्टमेन्ट घेतलेल्यांना 45 वर्षेपुढील नागरिकांना पहिला डोस देण्यात येणार आहे.

कोविशील्डच्या उपलब्ध साठ्यात 40 टक्के लस ही 45 वर्षे वयापुढील नागरिकांनी 25 मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना गुरुवारी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच 40 टक्के लस ही 45 वर्षे पुढील नागरिकांना ऑनलाइन बुकिंग करून अपॉइन्टमेन्ट घेतलेल्यांना पहिला डोस देण्यात येणार आहे.

त्यासाठी गुरूवारी सकाळी 8 वाजता ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकणार आहे. उर्वरित 20 टक्के लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.