देहरादून – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे देहरादून आणि ऋषिकेश ला जोडणारा पूल तुटला आहे. या दुर्घटनेत 12 गाड्या पूलावरून कोसळल्या. यात काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलासह लोडर आणि बारा गाड्या नदीत कोसळल्या. एका जखमीला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एसडीआरएफ ची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.
#WATCH | A bridge at Jakhan river on Ranipokhari-Rishikesh highway collapses in Dehradun, Uttarakhand
District Magistrate R Rajesh Kumar says traffic on the route has been halted. pic.twitter.com/0VyccMrUky
— ANI (@ANI) August 27, 2021
दरम्यान, उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. गढवालपासून ते कुमाउं पर्यंत सर्वठिकाणी पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी दुर्घटनाच्या घटना घडत आहेत. गंगोत्री महामार्गावर फकोट येथे रोडचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच भिन्नु गदेरे येथेही रस्ता वाहून गेला. काही दिवसांसाठी राज्य महामार्ग गंगोत्री बंद राहील. दून-मसूरी मार्ग आणि ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर देखील दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.