लखनौ – उत्तरप्रदेशात आगामी काळात 21 विमानतळ उभारण्यात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.
‘यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-2023’ च्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील नागरी विमान वाहतूक: उदयोन्मुख संधी या विषयावरील विशेष सत्रात बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, अयोध्या, काशी आणि मथुरेच्या या भूमीने भारताला नेहमीच नवा मार्ग दाखवला आहे. भारताच्या विकासात उत्तर प्रदेश नेहमीच प्राधान्य देत आला आहे आणि यापुढेही राहील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशला नवसंजीवनी मिळाली आहे,असा दावाही त्यांनी केला. त्यांनी उत्तर प्रदेशचे वर्णन “गुंतवणुकीसाठी सर्वात अनुकूल ठिकाण” म्हणून केले.