Uttar Pradesh Car Fire : उत्तर प्रदेशातील भोजीपुराजवळ एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बरेली-नैनिताल महामार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला असून या अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील सर्वजण एका लग्नाला उपस्थित राहून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारला ट्रकने जोरात धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेले. त्यांनतर कार लॉक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Bareilly, Uttar Pradesh: Bareilly SSP Ghule Sushil Chandrabhan says, “Near Bhojipura, an accident occurred on the highway… A car collided with a truck. The car got dragged and then caught fire… The car was centrally locked, hence the people inside the car lost their… pic.twitter.com/HtfUUB8bSK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 10, 2023
या घटनेची अधिक माहिती देताना बरेलीचे एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी या अपघाताविषयी माहिती दिली. भोजीपुराजवळ बरेली-नैनिताल महामार्गावर भीषण अपघात झाला. एका ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारला काही अंतर ओढत नेल्याने कारने पेट घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार सेंट्रली लॉक होती, त्यामुळे कारने पेट घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. यामुळे कारमधील सर्वांना आपला जीव गमवावा लागला. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये ७ प्रौढांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे.