बुर्कीना फासोमध्ये जिहादी कारवायांसाठी लहान मुलांचा वापर

दोरी (बुर्कीओना फासो) – आफ्रिकेतील बुर्कीना फासो या मागास देशात जिहादी कारवायांसाठी चक्क लहान मुलांचा वापर व्हायला लागल्याचे उघड झाले आहे. देशातील साहेत भागातल्या एका गावात चक्क लहान मुलांनी दहशतवादी हल्ला केल्याचे स्थानिक महिलेने वृत्तसंस्थेला सांगितले.

ही मुले धार्मिक घोषणाही देत होती. त्यातील काही जण इतकी लहान होती की त्यांना या अरबी घोषणा देखील देता येत नव्हत्या, असेही फातिमा अमादो यांनी सांगितले. जून महिन्यात झालेल्या या हल्ल्यात अमादो या आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्‍यात बचावले. मात्र या भीषण हल्ल्यामध्ये तब्बल 160 जण ठार झाले होते.

एरवी शांत असलेल्या बुर्किना फासोमध्ये गेल्या 5 वर्षात अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. आता तर या दहशतवादी कारवायांमध्ये चक्क लहान मुलांचाही सहभाग दिसायला लागला आहे. जिहादी कारवायांमधील लहान मुलांचा सहभाग या वर्षभरात तब्बल पाच पटींनी वाढला आहे.

आतापर्यंत जिहादी कारवायांमधल सहभागाबद्दल 14 मुलांना पकडण्यात आले आहे. त्यातील काही जण 2018 पासून दहशतवादी संघटनांच्या कामात सक्रिय आहेत. ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे, असे बुर्कीना फासोतील युनिसेफच्या प्रतिनिधी सॅनड्रा ल्रटोफ यांनी सांगितले.

बुर्कीना फोसोत दहशतवादी कारवायांमधल मुलांच्या सहभागाशिवाय शाळांवरील हल्ले ही देखील एक चिंतेची गोष्ट आहो. सहारा वाळवंटाशेजारील या देशामध्ये भर रस्त्यांवरही मुले घातपाती कारवायांमध्ये सहभागी हत असल्याचे दिसत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.