एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदके पटकावत घडवला इतिहास; जाणून घ्या ‘या’ महिला खेळाडूबाबत

टोकियो – ऑस्ट्रेलियाची नवोदित महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल सातवे पदक पटकावताना इतिहास घडवला. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदके जिंकणारी ती जगातील पहिलीच महिला जलतरणपटू ठरली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये एम्माने 4 सुवर्णपदकांसह एकूण 7 पदके पटकावली. अशी कामगिरी आतापर्यंत एकाही महिला खेळाडूला जमलेले नाही. पुरुषांमध्ये मायकल फेल्प्स, मार्क स्पिट्‌ज आणि मॅट बियोन्डी यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या फेल्प्सने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात सुवर्णपदक जिंकण्याचा अनोखा विक्रमही साकार केला आहे.

महिलांमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी एम्मा दुसरी ऍथलिट आहे. यापूर्वी 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकमध्ये रशियाच्या मारिया गोरोखोव्स्कायाने अशी कामगिरी केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.