बुर्किना फासो – पश्चिम आफ्रिकेच्या बुर्किना फासोमध्ये जिहादी गटांनी हल्ला केला. या हल्ल्यात उत्तर बुर्किना फासोमध्ये किमान 12 लोक ठार झाले, त्यापैकी बहुतेक सशस्त्र दलांना पाठिंबा देणारे नागरी स्वयंसेवक होते.
मध्य-उत्तर भागातील बोआला येथे बुधवारी हा हल्ला झाला. जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या बुर्किना 2015 पासून जिहादी हल्ल्यांचा सामना करत आहे. असंतुष्ट लष्करी अधिकाऱ्यांनीही या वर्षी दोन सत्तापालट केले आहेत. बुर्किना फासोच्या सीमेवर माली, नायजर, बेनिन, टोगो, घाना आणि कोट डी’आयव्हरी आहे.