US Singer Paula Abdul : प्रसिद्ध अमेरिकन गायिका पॉला अब्दुल हिने तिच्यावर एका सेलेब्रिटीकडून एका कार्यक्रमादरम्यान लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. तिनेया प्रकरणात खटला दाखल केला आहे. पॉलाने ब्रिटीश टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह निगेल लिथगो यांच्यावर ‘लैंगिक छळ’ केल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पॉलाने शुक्रवारी लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात आरोप केला की, अमेरिकन आयडॉलच्या सुरुवातीच्या हंगामात नायजेलने लिफ्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वृत्तानुसार, अमेरिकन आयडॉल ऑडिशनच्या एका दिवसानंतर गायक पॉलाने निगेल लिथगोवर आरोप केले आहेत की, त्याने हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिच्याशी गैरवर्तन केले.
न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये, पॉलाने नायजेलला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि लिफ्टचे दरवाजे उघडताच पळून गेली. रिपोर्टनुसार, नायजेलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली बाजू मांडताना त्याने, दोन दशकांहून अधिक काळ पॉला आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही नेहमीच एकमेकांचा आदर केला आहे. मात्र, पॉलाने केलेल्या आरोप माझ्यासाठी धक्कादायक आहेत असे त्याने म्हटले आहे.
तसेच न्यायालयाच्या कागदपत्रानुसार, पॉलाने लगेचच इतर अमेरिकन आयडॉलच्या सहकाऱ्यांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले, परंतु नोकरी गमावण्याच्या भीतीने कोणीही पुढे आले नाही. खटल्यात नमूद केलेली आणखी एक घटना म्हणजे जेव्हा पॉला अब्दुल ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ ची न्यायाधीश बनली आणि यादरम्यान नायजेलने तिच्या घरात तिच्याशी गैरवर्तन केले.