पाणबुड्या, जहाजांवर मारा करणारे हंटर हेलिकॉप्टर भारताला देण्यास अमेरिकेची मंजुरी

नवी दिल्ली – पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम असलेले ‘एचएच ६० ‘रोमियो’ सी हॉक’ हेलिकॉप्टरच्या विक्रीला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून भारताला या हंटर हेलिकॉप्टरची आवश्यकता होती.

लॉकहीड मार्टिनद्वारा निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात शोध घेण्यासाठी तसेच बचाव कामासाठी उपयोगी आहेत. अमेरिकेने २.४ अब्ज डॉलर्सला भारताला २४ ‘एचएच ६० ‘रोमियो’ सी हॉक’ हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजुरी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी २४ ‘एमएच-६० आर’ या बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजुरी दिली असून हे हेलिकॉप्टर भारतीय सुरक्षा दलांना पाणबुडी आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम करतील. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रस्तावित विक्रीच्या मदतीने भारत आणि अमेरिकेच्या संबंधात सुधारणा करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे.

या हेलिकॉप्टर्सना जगातील सर्वात अत्याधुनिक सागरी हेलिकॉप्टर मानले जाते. हिंदी महासागरात चीनची आक्रमकता लक्षात घेता भारतासाठी या हेलिकॉप्टरची मदत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.