नवी दिल्ली – “एमक्यु-9बी’ ड्रोनचा वापर करुन अमेरिकेने जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी अल जवाहिरीला ठार केले होते, ती राफेलपेक्षा वेगवान फायटर ड्रोन्स आता भारताला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यावेळी याबाबतच्या करारावरही सहमती झाल्याचे समजते.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनीही भारताला ड्रोन्स लवकरात लवकर मिळायला हवी, असे म्हटले आहे. यासाठी अमेरिकन सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. संरक्षण मंत्रालय तिन्ही सैन्यांकडून 31 एमक्यु-9बी हंटर किलर ड्रोन खरेदी करत आहे. यापैकी 15 ड्रोन भारतीय नौदलाला देण्यात येणार आहेत. भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन दिले जातील. याबाबतची औपचारिक विनंती यापूर्वीच पाठवली आहे. त्याच्या खरेदी प्रक्रियेचा करार या आर्थिक वर्षात पूर्ण होण्यास तयार आहे.
Excellent meeting with @SecDef Lloyd Austin. We talked about ways to further strengthen defence relationship between our nations. The scope for cooperation in defence is immense.
We are charting new pathways of cooperation by pursuing stronger defence industrial engagement and… pic.twitter.com/BQMOs6Gqjg
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 10, 2023
25 हजार कोटी रुपयांची डील
तिन्ही सैन्याच्या 31 एमक्यु-9बी हंटर किलर ड्रोन खरेदीचा हा करार सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरक्षा दलांच्या ताकदीत लक्षणीय वाढ होईल. जमिनीपासून समुद्रापर्यंतच्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यास आणि त्यांचा सामना करण्यास मदत होईल. यामुळे निगराणी वाढेल आणि संभाव्य धोक्यापासून बचाव करण्याची क्षमताही लक्षणीयरीत्या वाढेल.
काय आहे एमक्यु-9बी ड्रोन? ही आहे एमक्यु-9बी ड्रोनची खासियत?
1. स्काय गार्डियन आणि सी गार्डियन दोन प्रकार
2. सागरी पाळत ठेवण्यासाठी सी गार्डियन
3. स्काय गार्डियन ड्रोन जमिनीवर तैनात
4. एका वेळी 40 तासांपर्यंत उडण्याची क्षमता
5. 40 हजार फूट उंचीवर उडण्याची क्षमता
6. एकाच उड्डाणात 1900 किमी क्षेत्राचे निरीक्षण
7. एका तासात 482 किलोमीटरचा वेग
8. क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा डागण्याची क्षमता
9. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
10. पाणबुडीविरोधी युद्धाने सुसज्ज आहे