नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेदरम्यान आजपासून ३१ मार्च दरम्यान पूर्व किनाऱ्यावर टायगर विजय-२४ या द्विपक्षीय आणि तिन्ही सेनादलांचा सहभाग असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग विमानांसह सुसज्ज जहाजे, भारतीय लष्कराचे सैनिक आणि वाहने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह शीघ्र कृती वैदयकीय पथक देखील या सरावात सहभागी झाली आहेत.
अमेरिकी नौदलाच्या जहाजांवर तैनात अमेरिकी मरीन कोअरची पथके तसेच अमेरिकेच्या लष्करातील सैनिक अमेरिकेतर्फे या सरावात सहभागी होणार आहेत. मानवतावादी मदत आणि आपत्तीनिवारणासाठी दोन्ही दोन्ही देशांच्या सेनादलांमध्ये जलद आणि विनाअडथळा समन्वय राखणे हा या सरावाचा उद्देश आहे.
सरावाचा बंदर परिसरातील टप्पा आजपासून २५ मार्च या कालावधीत पार पडेल. बंदराच्या ठिकाणचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सेनादलांची पथके तैनात करून ही जहाजे समुद्रातील टप्पा पूर्ण करण्यासाठी निघतील आणि तेथील परिस्थितीनुसार सागरी, जमिनीवरील तसेच समुद्रातील अशा दोन्ही प्रकारची आणि मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्ये हाती घेतील.