जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी निसार अहमद भारताच्या ताब्यात

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील लॅथापोरामध्ये ३०-३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा कट रचणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी निसार अहमदला संयुक्त अरब अमीरात (UAE) ने भारताला सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. निसार अहमदला राष्ट्रीय शोध पथक ( एनआयए) ने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

जम्मू-काश्मीरमधील लॅथापोरामध्ये ३०-३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दहशतवादी संघटनेचा कमांडर नूर त्रालीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे जैश-ए-मोहम्मदने त्यावेळेस सांगितले होते. २६ डिसेंबर ला नूर त्राली या दहशतवाद्यास भारतीय सेनादलाने कंठस्नान घातले होते.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.