पुणे: युपीएचं सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाईल. तसेच कर्ज फेडता न आल्यास एरवी फौजदारी गुन्हा दाखल व्हायचा, पण यापुढे दिवाणी गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता घाबरायचं काही कारण नाही.आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तरुणांना नव्यानं व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यासाठी कुठलीही शासकीय परवानगी घ्यावी लागणार नाही, तशी तरतूद युपीएचं सरकार आल्यास केली जाणार आहे. पहिली ३ वर्ष कुठल्याही परवानगीविना विनाअडथळा व्यवसाय करता येईल, हे लक्षात घ्या. तरूण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, ही यामागची धारणा असल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान अजित पवार म्हणाले, ‘जे लोक भाजपमध्ये गेले ते कशासाठी गेले, हे मी नाव घेऊन सांगेन’, ‘मला सगळ्यांची अंडीपिल्ली माहीत आहेत’, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. काँग्रेसने दिलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या मागे आम्ही सगळे ताकदीनं उभे आहोत, असेही पवार म्हणाले.