वॉशिंग्टन : अमेरिकेत समलिंगी विवाहाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. दरम्यान, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने समलिंगी विवाहाला फेडरल संरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे. मंगळवारी हे विधेयक 267 पैकी 157 मतांनी मंजूर झाले. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 47 रिपब्लिकन खासदारांनीही या विधेयकाचे समर्थन केले.
आता या विधेयकाला सिनेटमध्ये आव्हान मिळू शकते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने मंजूर केल्यानंतर हे विधेयक सिनेटमध्ये ठेवण्यात येणार आहे. जिथे रिपब्लिकन पक्षाच्या 10 मतांची आवश्यकता असेल. 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे 50 सदस्य आहेत. वास्तविक, एलजीबीटीक्यू (LGBTQ )अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हाऊस डेमोक्रॅट्सने विवाहाचा आदर कायदा आणला आहे.
‘रेस्पेक्ट फॉर मॅरेज अॅक्ट’ (विवाह कायद्याचा आदर) यूएस राज्यांना दुसर्या राज्यात केलेल्या वैध विवाहांना मान्यता देण्यास भाग पाडेल. याशिवाय या कायद्यामुळे समलिंगी पण आंतरजातीय विवाहांनाही संरक्षण मिळणार आहे. हे विधेयक 1996 चा डिफेन्स ऑफ मॅरेज ऍक्ट रद्द करते, ज्याने विवाह हे स्त्री आणि पुरुष यांच्यातील मिलन म्हणून परिभाषित केले होते.