Urvashi Rautela । बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या आगामी JNU चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात ती राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करू शकते. येत्या लोकसभा निवडणूकही लढवू शकते. खुद्द उर्वशीने एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
मुलाखतीत जेव्हा अभिनेत्रीला विचारले गेले की, तिला राजकारणात किती रस आहे, तेव्हा अभिनेत्रीने खुलासा केला की, तिला आधीच निवडणुकीचे तिकीट ऑफर केले गेले आहे. उर्वशी म्हणाली,’मला आधीच तिकीट मिळाले आहे आणि मला त्याचा भाग व्हायचे की नाही हे आता मला ठरवायचे आहे. उर्वशी पुढे म्हणाली की, निवडणूक लढवायची की नाही हे चाहत्यांनी कमेंट करून सांगावे.’
उर्वशी रौतेला निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या ऐकून चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली ,’उर्वशी कृपया आम्हाला माफ करा, तुझा अभिनय कसा तरी खपवून घेततोय आता तू राजकारणात येत आहे.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘तुला तिकट देणारा पक्ष कोणता ?.’ तर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे.
उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर उर्वशी रौतेला रवी किशनसोबत JNU या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, रश्मी देसाई, सोनाली सहगल आणि विजय राज हे कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार आहे.
हे वाचले का ? ‘दिल चाहता है’चा सिक्वेल येणार ?