Dr. Nitin Kodawate । लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होतोय. या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला मोठमोठे नेते सोडून गेले आहेत. त्यातच काँग्रेसमध्ये सुरु असलेले हे डॅमेज कंट्रोल अजून थांबत नाही. कारण आता काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपने जोरदार धक्का दिला आहे.
भाजपात प्रवेश करणार Dr. Nitin Kodawate ।
डॉ नितीन कोडवते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये करणार प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे . गुरुवारीच काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. परंतु या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही.
नितीन कोडवते होते इच्छूक Dr. Nitin Kodawate ।
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. 9 इच्छुकांनी मुलाखती देण्याचा सोपस्कार पार पाडला होता. त्यानंतर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते २०१९साली काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. तसेच नितीन कोडवतेंकडे होती. काँग्रेस प्रदेश सचिवची जबाबदारी होती. परंतु तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन ते भाजपत गेल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुणे लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.