UPI service| श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय सेवा आणि मॉरिशसमध्ये रुपे कार्ड सेवांचा प्रारंभ झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ दुरस्थ माध्यमातून या सेवांची सुरुवात केली. यामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणार्या भारतीय प्रवाशांना तसंच भारतात प्रवास करताना मॉरिशसच्या नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे.
श्रीलंका आणि मॉरीशस मध्ये राहणार्या भारतीय वंशाच्या लोकांना तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रणालीचा विशेष लाभ होईल. नेपाळ, भूतान, सिंगापूर, आणि आखाती देशांपैकी संयुक्त अरब अमिरात या देशानंतर आता आफ्रिकेत मॉरीशस रुपे कार्डाचे परिचालन सुरु होत आहे. यामुळे भारतातून मॉरीशसला येणार्या लोकांची चांगली सोय होईल. स्थानिक चलनातील नोटा तसेच नाणी विकत घेण्याची गरज कमी होईल. युपीआय तसेच रूपे कार्ड या प्रणालींमुळे वास्तव वेळेत, किफायतशीर आणि अत्यंत सुलभतेने आपल्या स्वतःच्या चलनात आपल्याला पैसे भरता येतील.
फिनटेक नवोन्मेष आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताचे मजबूत सांस्कृतिक आणि लोकांशी असलेले घनिष्ट संबंध लक्षात घेता, यामुळे जलद आणि अखंड डिजिटल व्यवहाराच्या अनुभवाद्वारे आणि देशांमधील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याद्वारे अधिकाधिक त्याचा फायदा होईल.
यामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणार्या भारतीय नागरिकांसाठी तसेच भारतात येणार्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी युपीआय व्यवहार सेवांची उपलब्धता सक्षम होईल. मॉरिशसमधील रूपे कार्ड सेवांचा विस्तार मॉरिशसमधील रूपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करण्यास मॉरिशसच्या बँकांना सक्षम करेल आणि भारत आणि मॉरिशसमधील व्यवहारांसाठी रूपे कार्डचा वापर सुलभ करेल.