पिंपरी : पुण्यातील दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एकजण कावेरीनगर (वाकड) पोलीस वसाहतीमध्ये वास्तव्यास आहे. पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या एका पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी करोना बाधित असल्याचे दोन दिवसांपूर्वी निष्पन्न झाले. त्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली. त्यामध्ये आणखी दोघे पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
याबाबत पुण्यातील ‘त्या’ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यास दुजोरा दिला आहे. तसेच वाकडमधील स्थानिक नगरसेवकाने याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेस कळविले आहे. लवकरच कावेरीनगर पोलीस वसाहत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात येणार आहे.पोलीस वसाहतीमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकारपरिषदेत मंगळवारी सांगितले कि, देशात मागील तासांत हजार ३६६ कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर २३ देशातील ६१ जिल्ह्यात मागील १४ दिवसात कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती त्यांनी दिली.