लखनऊ : उत्तर प्रदेशात सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या संघटनेच्या कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला मंगळवारी पत्र पाठवण्यात आले आहे. या संघटनेचा उत्तर प्रदेशचा प्रमुख वासीमसह त्याच्या 16 साथिदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राज्यात का विरोधात हिंसाचार भडकावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आम्ही गृहमंत्रालयाकडे केली आहे, असे पोलिस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.