ब्रिस्बेन : रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा म्हणाली की, ती 2020 मध्ये होणाऱ्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
या स्पर्धेत शारापोव्हाची वाईल्ड कार्ड एन्ट्री भेटली आहे. डोपिंगवरील बंदी हटवल्या नंतर शारापोव्हा खांद्यांच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्यांना केवळ आठ स्पर्धा आणि 14 सामने खेळता आले. यामुळे त्यांची जागतिक क्रमवारी 133 व्या स्थानावर पोहोचली.
शारापोव्हा म्हणाली की, ती कुयोंग क्लासिक स्पर्धेतही खेळेल, पण २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिला वाईल्ड कार्ड प्रवेश मिळेल की नाही हे ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय निकाल निश्चित करेल असेही त्या म्हणाल्या.