UP Lok Sabha । लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. राज्यात इंडिया युती तुटण्याची प्रक्रिया सुरूच आहे. नुकताच ‘अपना दल कामेरवाडी सपापासून वेगळा झाला. आता जनवादी पक्षानेही सपापासून वेगळे होण्याची घोषणा केलीय. जनवादी पक्षाचे प्रमुख संजय चौहान यांनी सपावर आश्वासने मोडल्याचा आरोप करत युती तोडली आहे.
पल्लवी पटेलच्या अपना दल कामेरवाडीनंतर आता जनवादी पार्टीनेही सपापासून फारकत घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष संजय चौहान यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की,”सपाने त्यांना घोसी मतदारसंघातून तिकीट देण्याचे वचन दिले होते, परंतु या जागेवरून राष्ट्रीय सचिव राजीव राय यांना उमेदवारी दिली आहे.
सपापासून दुरावलेला आणखी एक मित्र UP Lok Sabha ।
सपाच्या या निर्णयानंतर संजय चौहान यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी 11 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. संजय चौहान म्हणाले की, मी स्वत: घोसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यासोबतच त्यांनी आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तीन जागांवर इतर उमेदवारही लवकरच जाहीर केले जातील.
जनवादी पक्षाने आतापर्यंत आझमगड, गाझीपूर, बलिया, चंदौली, वाराणसी, मछली सिटी, कुशीनगर, गोरखपूर, अमेठी, देवरिया येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यातील अनेक जागांवर उमेदवारही उभे केले आहेत. जनवादी पार्टी हा एकमेव पक्ष उरला होता जो 2022 च्या निवडणुकीत सपासोबत युती करत होता, आता हा पक्षही सपापासून वेगळा झाला आहे.
चंद्रशेखर आझाद यांच्याशीही चर्चा अंतिम टप्प्यात UP Lok Sabha ।
जनवादी पक्षापूर्वी ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल, महान दल आणि पल्लवी पटेल यांचा अपना दल कामेरवाडी यांनीही सपापासून फारकत घेतली आहे, तर आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद यांच्याशीही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आता यूपीमध्ये फक्त सपा आणि काँग्रेसची युती उरली आहे.