Shraddha Kapoor । अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. अभिनयासह तिच्या सौंदर्याचे देखील खूप चाहते आहे. अशात सोशल मीडियावर तिच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहे.
सोशल मीडियावर श्रद्धाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणार व्यक्ती लेखक राहुल मोदी आहे. हे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाजही लावला जात आहे.
राहुल मोदी ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटाचे लेखक आहे. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाचा जामनगरमध्ये कार्यक्रमातही यांना एकत्र बघितल्या गेले, तसेच श्रद्धाला राहुलसोबत जामनगर विमानतळावरही स्पॉट झाली. मात्र यावेळी अभिनेत्री मीडियासमोर येत नव्हती. नंतर फोटोसाठी श्रद्धा एकटीच आली होती. पण आता श्रद्धाला तिचे नाते कोणापासून लपवायचे नाही अशी बातमी समोर येत आहे.
वृत्तानुसार, लवकरच हे दोघेही अधिकृतपणे नात्याची कबुली देणार आहे. वेबसाइटनुसार, हे दोघेही तू झुठी मैं मकर या चित्रपटादरम्यान एकत्र आले होते. चित्रपटात काम करताना त्यांच्यातील बंध अधिक घट्ट होत गेले. दोघेही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहेत त्यामुळे आता त्यांना त्यांचे नाते लपवायचे नाही.
श्रद्धाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची तू झुठी मैं मकर या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता श्रद्धा स्त्री 2 या चित्रपटात दिसणार आहे ज्यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. त्याचा पहिला भाग सुपरहिट झाला होता आणि आता दुसऱ्या भागाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
हे वाचलं का ? ‘भाजप’ आणि ‘काँग्रेस’ला कोटींच्या घरात देणगी देणारी ‘मेघा इंजिनियरिंग’ आहे ‘या शेतकरी पुत्राची’ ? महाराष्ट्र कनेक्शन काय ?