प्रयागराज – उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे नेते योगेश शुक्ला यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अलाहबादेतून त्यांचा पराभव झाला होता. त्यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावरून अलाहबादमधून निवडणूक लढवली होती. मात्र समाजवादी पार्टीच्या रेवती रमण सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. काल लखनौमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेसकडून आपला अपेक्षाभंग झाला असून कॉंग्रेसमुळे आपला राजकारणात येण्याचा मूळ उद्देशाचा पराभव झाला. देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे आणि वारशाचे संवर्धन करण्यासाठी आपण भाजपमध्ये परत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भाजपच्या पंचायत सेलच्या समन्वयाचे काम केले आहे.