UP Congress Candidates List। देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येतायत. आता पक्षांकडून जागावाटप आणि तिकिटांचे वाटपाची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केले असल्याचे समोर आलंय.
17 पैकी 9 उमेदवारांची निवड UP Congress Candidates List।
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने 17 पैकी 9 उमेदवारांची निवड केली असल्याचा दावा करण्यात येतोय. प्राप्त माहितीनुसार, संसदीय मंडळाच्या परवानगीनंतर ही यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येतंय. अजय राय वाराणसीतून पुन्हा काँग्रेसचे उमेदवार होण्याची शक्यता आहे, असा दावा केला जातोय. 2019 च्या निवडणुकीत अजय राय यांना 14.44 टक्के मते मिळाली होती.
हेही वाचा
“..अन्यथा आघाडी नाही” अखिलेश यादव यांचा काँग्रेसला इशारा
सहारनपूरमध्ये 2019 च्या निवडणुकीत इम्रान मसूद तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी त्यांना हायकमांडकडून पुन्हा उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. अमरोहामधून बसपने हकालपट्टी केलेले दानिश अली, बाराबंकीमधून पीएल पुनिया यांचा मुलगा तनुज पुनिया, झाशीतून माजी खासदार प्रदीप जैन, गाझियाबादमधून डाली शर्मा, महाराजगंजमधून वीरेंद्र चौधरी, फतेहपूर सिक्रीमधून रामनाथ सिकरवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
याशिवाय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर नगरमधील आलोक मिश्रा आणि अजय कपूर, मथुराचे माजी आमदार प्रदीप माथूर, देवरियाचे अखिलेश प्रताप सिंग किंवा अजय लल्लू, बांसगावचे कमल किशोर आणि बुलंदशहरचे बन्सी सिंह यांच्या नावांचा विचार केला जातोय. अनुग्रह नारायण सिंह प्रयागराजमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.