भिगवण -येथील परिसरात अवकाळी पावसाने सोमवारी (दि. 1) हजेरी लावली. मागील दोन आठवड्यापासून उष्णतेमुळे नागरीक हैराण झाले होते. सोमवारी हलक्या सरींनी हवेत गारवा निर्माण झाला होता.
भिगवण पंचक्रोशीत शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. आडसाली उस लागवडीची जलद पुर्वतयारी करण्याची लगबग आता शेतात सुरु झाली आहे. उन्हाळी भुईमुग काढणीला वेग आला आहे.
दुग्धव्यवसाय करणाऱ्या वर्गाने पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून दूर असलेल्या जिरायती गावामध्ये खरीप पिकांची तयारी सुरु झाली आहे.