शपथविधीपर्यंत ‘साहेब’ नक्की काय करतील हे सांगू शकत नाही

मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा हा बऱ्याच खलबतानंतर सुटला आहे. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्अ्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. त्यातच आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तास्थापन करण्यासाठीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्या विधानमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, वृत्त वाहिनीशी बोलतांना बच्चू कडू यांनी  सत्तास्थापनेबाबत  प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा भाजप आणि शिवसेना युती होण्याची शक्यता होती. मात्र त्यांनंतर राजकीय समीकरणं पूर्णत: बदलली आहे. आता नव्या आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, मात्र जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवार साहेब नक्की काय करतील हे सांगू शकत नाही. पवारसाहेब अजून अजित पवारांनाच नाही समजले तर मला काय समजणार,’ त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा  सत्तास्थापनेचा तिढा की नाही अशी चर्चा  राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.