जागतिक नेमबाजी स्पर्धा : इलावेनिल वलारिवानचा सुवर्णवेध

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज इलावेनिल वलारिवानने गुरूवारी आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात २५०.८ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेत चायनीज तैपईच्या लीन यिंग शिनला रौप्य तर रोमानियाच्या लाॅरा जार्जेटा काॅमनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताची मेहूली घोष १६३.८ गुणांसह ६ व्या स्थानावर राहिली.

आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनलमधील इलावेनिलचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. यापूर्वी, २००३ मध्ये वर्ल्ड कप फायनल स्पर्धेत महिलांच्या १० मी. एअर रायफलमध्ये अंजली भागवतने सुवर्ण जिंकले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.