उद्धव ठाकरेंच्या घोषणेपूर्वीच ‘या’ ठिकाणी मिळतं दहा रुपयात जेवण

मुंबई – मंगळवारी (दि. ८) पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख ‘उद्धव ठाकरे’ यांनी राज्यभरात दहा रुपयात पोटभर जेवण देण्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेच्या जाहीरनाम्यात देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या योजनेचं खरोखर रोल मॉडेल अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून सुरू आहे. आणि या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर या तिघांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये 1 मे रोजी दहा रुपयात जेवण ही संकल्पना सुरु करण्यात आली. या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ असं जेवण दहा रुपयात दिलं जात आहे. ते सुद्धा अनलिमिटेड.

 

Leave A Reply

Your email address will not be published.