Pooja Hegde New Home| मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्या अनेक सिने क्षेत्रातील कलाकार मुंबईत घर खरेदी करत आहेत. यातच आता अभिनेत्री पूजा हेगडे हिचा देखील समावेश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजाने मुंबईत स्वत:चं अलिशान घर खरेदी केलेले आहे. लवकरच पूजा या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. मुंबईतील वांद्रा परिसरामध्ये खरेदी केलेले घर ४ हजार स्क्वे.फूट इतके मोठे आहे. त्या घराची किंमत ४५ कोटी असल्याचं समोर आले आहे. पूजाचं घर सीफेस आहे. दरम्यान, पूजाने नवं घर खरेदी केल्याने चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘मोहोंजोदारो’ या चित्रपटातून पुजा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यासोबतच पूजा ‘हाऊसफुल ४’, ‘सर्कस’ या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. सध्या अभिनेत्री ‘देवा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय तो ‘सनकी’ नावाच्या चित्रपटातही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा:
”औषध” म्हणून तुम्ही विष तर घेत नाहीत ना बनावट औषधे ‘अशी’ ओळखा…