अशोक पवार यांच्या विजयाचा निर्धार

न्हावरे : इनामगाव येथील ग्रामस्थांनी महाआघाडीचे शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अँड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढून इनामगाव येथील श्री. सिद्धेश्वराच्या मंदिरात पवार यांच्या विजयाचा निर्धार केला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अशोक पवार यांच्या नावाने विजयाच्या घोषणा दिल्या. तसेच अशोक पवारांना सर्वाधिक मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

याप्रसंगी रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, सचिन मचाले, माजी संचालक अर्जुन मचाले, माजी सरपंच हमीद शेख, उपसरपंच माऊली शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संजय घाडगे, दत्ता नलगे, वाल्मिक गांधले, संपत नलगे, मदन नलगे, मनोहर मचाले, राजाराम मचाले, बाळासो नलगे, शरद मचाले इत्यादी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मोकाशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आपले स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी अँड.अशोक पवार यांनाच निवडून द्या. युती सरकार हे फक्त आश्वासने देणारे सरकार आहे. त्यांनी शेतकरी व कामगार वर्गाची निराशा केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर जनता नाराज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.