वॉशिंग्टन : अमेरिकेत मागील काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच आणखी एका घटनेची भर पडली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका अज्ञाताकडून सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केला. या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 21 पेक्षा जास्त जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
The Associated Press: Odessa police spokesman says 5 people dead, at least 21 injured by gunfire in West Texas shooting.
— ANI (@ANI) September 1, 2019
दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका ट्रकचे अपहरण करून हा गोळीबार करण्यात आला असल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या मिडलॅंड भागात ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अगोदर अमेरिकेच्या टेक्सास आणि ओहियोमध्ये देखील अज्ञाताकडून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनांमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला होता तर 40 पेक्षा जास्त जण या घटनांमध्ये जखमी झाले होते.