#व्हिडीओ : मयुरेश्‍वरा प्रथम तुला वंदितो…

तुषार धुमाळ

अष्टविनायकातील प्रथम स्थान : भाविकांची दर्शनासाठी गर्दी

कऱ्हेच्या तीरी एकसे मोरगावू।
तिथे नांदतो मोरया देव पाहू।।
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे।
मनी इच्छिले मोरया देता आहे।।

वाघळवाडी – मोरगावचा मोरया भक्‍तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर मोरेश्‍वराचे ठाण आहे. मोरगावच्या गणेशाला मोरेश्‍वर किंवा मयुरेश्‍वर असे म्हणतात. मोरावर बसून श्री गणेशाने सिंधू राक्षसाचा नाश केला म्हणून तेव्हापासून मोरेश्‍वर किंवा मयुरेश्‍वर म्हणून हा अवतार ओळखला जाऊ लागला. दरम्यान, गणेशोत्सवास अवघा एक दिवस शिल्लक असल्याने मंदिरात तयारीला वेग आला आहे.

तर अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मयुरेश्‍वराची ओळख असल्याने अष्टविनायक यात्रा सुरू केल्यावर पहिले मयुरेश्‍वराच्या चरणीच भाविक लीन होत असल्याची परंपरा आहे. श्रीगणेशाचे पृथ्वीतलावर प्रथम मंदिर म्हणून मोरगावच्या गणपती मंदिर ओळख आहे. हे प्राचीन मंदिर आहे या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या भव्य मुख्य प्रवेशद्वारमार्गावर सर्व भाविकांचे लक्ष वेधते. त्याचबरोबर श्रीगणेशाच्या मंदिरासमोर नंदी पहावयास मिळतो तो इतर कोणत्याही मंदिरासमोर पाहण्यास मिळत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर मंदिराच्या समोर श्री गणेशाचा प्रिय वाहन मूषक आहे, त्यानंतर आतील बाजूस भव्य असे मंदिर सुंदर अशी श्रीगणेशांची मूर्ती आहे. भव्य अशी दीपमाळ आहे. मंदिराच्या चारीही बाजूंनी भक्‍कम अशी उंच तटबंदी आहे. मंदिराच्या आतील बाजुस एक तरटी झाड आहे. या झाडाखाली मोरया गोसावी यांना श्रीगणेशाने दर्शन दिले, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या झाडास कल्पवृक्ष असे संबोधले जाते. त्याचबरोबर मंदिराच्या आतील बाजुस गणेशाच्या विविध रूपांची प्रतिमा आहेत. मोरगाव भाद्रपद व माघ या महिन्यात फार मोठ्या यात्रा असते.

या उत्सवामध्ये चारद्वार यात्रेला फार मोठे महत्त्व आहे. भाद्रपद यात्रा उत्सवाच्या निमित्ताने गुरव मंडळीची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा जलस्नान व अभिषेक पूजेसाठी सर्व धर्मियांसाठी शनिवार (दि. 31) पासून खुला करण्यात आला असून पुढील तीन दिवस श्रींना थेट जलस्नान भाविकांना घालता येणार आहे. यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांना कोणत्या अडचणी येऊनही म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एक गाव गणपतीची प्रथा कायम

मोरगावत एक गाव गणपती पद्धत असून मोरगाव घरघुती किंवा सार्वजनिक गणपती बसवला जात नाही, ही प्रथा यंदाही कायम असल्याने मोरगावातील भाविक मयुरेश्‍वराच्या दर्शनासाठी गर्दी करणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)