चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे साथीयम या लोकप्रिय टीव्ही चॅनलच्या मुख्यालयावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या अज्ञात व्यक्तीने तलवारी घेऊन चॅनलच्या ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा व्हिडियो कैद झाला असून या फुटेज मध्ये हा अज्ञात व्यक्ती तलवारी घेऊन ऑफीसच्या पार्किंग परिसरात आता येतांना दिसत आहे.
या बाबत चैनल चे प्रबंध निदेशक, आइजैक लिविंगस्टोन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,’ या अज्ञात व्यक्तीने कार पार्किंग मधून ऑफीसमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा त्याकडे एक गिटार बॅग होते ज्यात हत्यारे होते. तो जेव्हा ऑफिस मध्ये आला तेव्हा तो माझे नाव घेत विचारत होता. अशी ही त्यांनी माहिती दिली. या संपूर्ण घटनेचा स्थानिक पोलीस तपास करीत आहे.