मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे विशेष न्यायालयात केला. तसेच हे पैसे आरोपींना कोणी उपलब्ध केले याचा शोध घ्यायचा आहे, असेही सांगण्यात आले. अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे एनआयएने न्यायालयात म्हटले आहे.
ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. एनआयएतर्फे विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचे एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितले. 4 ते 5 साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.