फलटण -येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी ग्रॅच्युइटीसाठी ऐन दिवाळीत उपोषण सुरू केले आहे. आंदोनाला पाच दिवस झाले तरी या प्रश्नात कारखाना आणि प्रशासन लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ या कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी (शनिवार) तहसील कार्यालयाबाहेर अभ्यंगस्नान केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखान्याच्या निवृत्त कामगारांचे गॅच्युइटीसाठी आंदोलन सुरू आहे. जोवर पैसे मिळणार नाहीत, तोवर आंदोलन करण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. श्रीराम साखर कारखाना व नीरा व्हॅली अर्कशाळेतून 2017-20 या काळात 60 कामगार निवृत्त झाले आहेत.