ऑनलाईन गैरव्यवहारांचा ब्रिटन-भारताकडून तपास

लंडन – अलिकडच्या काळात झालेल्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सर्व्हिस गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी भारत आणि ब्रिटनच्या तपास संस्थांनी भारतातील किमान 6 शहरांमधील 10 संशयास्पद कार्यालयांवर छापे घातले आहेत. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

ब्रिटनच्या तपास संस्थेने या तपासासाठी पुढाकार घेतला असून ब्रिटनमधील काही कंपन्यांमधील लोकांची भारतातील कंपन्यांद्वारे चुकीचे व्यवहार केले आहेत. अशी माहिती लंडन पोलिसांनी दिली असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

ब्रिटनच्या पोलिसांनी या संदर्भात साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून संबंधित कंपन्यांच्या व्यवहाराचे तपशील, पुरावेही दिले आहेत. त्याच्या आधारे भारतातील पोलिसांनी फसवेगिरी करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे.

या तपास कामाला सीबीआयने केलेल्या मदतीबाबत ब्रिटन पोलिसांनी आभार मानले आहेत. या तपासाच्या आधारे दोषींवर भारतीय न्यायालयांमध्ये कारवाई करणे शक्‍य होईल, असे सिटी ऑफ लंडन पोलिसातील हंगामी तपास मुख्य अधीक्षक अलेक्‍स रोथवेल यांनी सांगितले. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने अशा गैरव्यवहारांना त्वरित आळा घालणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

दोषींकडून अनेकांच्या कॉम्प्युटरवर तांत्रिक समस्येचा ‘पॉप अप’ मेसेज पाठवला जात असे. त्यानंतर ऑनलाईन असिस्टन्ससाठी ग्राहकांना एक हेल्पलाईन नंबर दिला जात असे आणि ऑनलाईन सपोर्टसाठी ऑनलाईन शुल्कही आकारले जात असे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.