माळेगाव (वार्ताहर)- माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ॲप्टीट्यूड ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. ट्रेनिंगमध्ये कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल आदी शाखांमधील एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना वाढवण्यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले चांगले ठिकाणी नोकरीच्या संधी मिळाव्या यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयामध्ये १० दिवसांच्या कालावधीत अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्टीट्यूड ट्रेनिंगचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.
ट्रेनिंगमध्ये बौद्धिक कौशल्यावर आधारित विविध विषयांचे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी येणारे काळात विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असणारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व कम्युनिकेशन स्किल या विषयांवर ट्रेनिंगचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ यांनी दिली.
चार वर्षात १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. उपक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष केशवराव जगताप, संचालक मंडळ , विश्वस्त रविंद्र थोरात, वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, सीमा जाधव, चैत्राली गावडे, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे व प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांचे सहकार्य लाभले.