Udayanraje Bhosale – साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.
युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू…. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं. अशा या दिलदार नेत्याचा आज वाढदिवस असून, गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात लगबग सुरू आहे. । Udayanraje Bhosale
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी आले असता त्यांच्या शुभहस्ते श्री भवानीमाता मंदिरात महापूजा संपन्न झाली.@mieknathshinde pic.twitter.com/4P1Po1nm9l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 24, 2024
त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलकांनी माहोल बदलून गेला आहे. त्यानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भवानीमाता मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी आले असता त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आनंदाचा दिवस आहे. उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे. तसे उदयनराजे कायम उत्साहात असतात.
तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. राज्यसभेवर देखील गेले. उदयनराजेंकडून अनेक विकासाची कामे झाली. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे. आज राज्याचा कारभार छत्रपतीना डोळ्यासमोर ठेऊन करत आहे. असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.