सातारा – भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात उद्या, दि. 3 पासून शनिवार, दि. 12 पर्यंत रोज सकाळी 7 पासून पदयात्रा होणार आहेत.
उद्या, दि. 3 रोजी चिमणपुरा पेठेतील गारेच्या गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात होणार आहे. कारंडबी नाका, कृष्णेश्वर पार्क, गोखले हौद, चिरमुले शाळा, शाहू बोर्डिंग, अभ्यंकर गणपती, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदिर पॅलेस, सुरुची बंगला, जाधव वाडा, कोटेश्वर मैदान, ऐक्य प्रेस, राधिका चौक, मोती चौक अशी पदयात्रा निघणार आहे.
शुक्रवार, दि. 4 रोजी बुधवार नाका, बारटक्के चौक, बसाप्पा पेठ, कोमठी चौक, झेंडा चौक, इंदलकर आळी, कुंभार आळी, भैरवनाथ पटांगण, भैरवनाथ मंदिर, विभूते पार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, मेहेर देशमुख कॉलनी, बाबर कॉलनी, शेंडे गणपती मंदिर ते बुधवार नाका, शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 7 वाजता ढोल्या गणपती, समर्थ मंदिर, बोगदा, भुई गल्ली, खारी विहीर, डफळे हौद, तारळेकर चौक, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, कात्रे वाडा, हेडगेवार चौक, कोल्हटकर आळी, चांदणी चौक, रविवार, दि. 6 रोजी लक्ष्मी टेकडी, सदरबझार पोलीस चौकी, बझार पेठ, आमणे बंगला, भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, मुथा गॅरेज, ग्रीन फिल्ड हॉटेल, कुबेर विनायक मंदिर, अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोवई नाका, सोमवार, दि. 7 रोजी यादोगोपाळ पेठेतील तालीम खाना, फुटका तलाव, एकता चौक, गोल मारुती मंदिर, सोमवार पेठ, दत्त मंदिर, पेंढारकर हॉस्पिटल, फुटका तलाव, माटे राम मंदिर, बालविकास मंडळ, सोन्या मारुती मंदिर ते मारवाडी चौक, बुधवार दि. 9 रोजी नगरपालिका कार्यालय, शाहू चौक, कुंभार वाडा, आयडीबीआय बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंक, तहसीलदार कार्यालय, भाजी मंडई, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, चांभार वस्ती, वडार वस्ती, श्रीनाथ मंदिर चौक, लकी आर्टस्, पावन हनुमान मंदिर, जगताप कॉलनी, ऍक्सिस बॅंक, भोसले मळा, कर्मवीर सोसायटी, हॉटेल सेनॉर चौक, डॉ. सुहास पोळ हॉस्पिटल, पोलीस लाईन, गुरुवार, दि. 10 रोजी अदालत वाडा, वाघाची नळी, देवी चौक, कमानी हौद, कूपर कारखाना, शिंदे गल्ली, घोरपडे वखार, नगरपालिका कार्यालय, चार भिंती या मार्गावर पदयात्रा निघणार आहे.
शुक्रवार, दि. 11 रोजी मोनार्क चौक, एस. टी. कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बझार चौक (शाहूनगर), जगताप हॉस्पिटल, कोल्हाटी वस्ती, मशीद, मारुती मंदिर, माळी आळी, अभयसिंहराजे भोसले कमान, म्हस्के वाडा, जिजामाता उद्यान, बागडे वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, व्यंकटराव मोरे पतसंस्था, गोडोली जकात नाका, शनिवार, दि. 12 रोजी मोती चौक, मारवाडी चौक, सम्राट चौक, 501 पाटी, देवी चौक, वेलणकर बोळ, गुरुवार परज, कमानी हौद, शेटे चौक, एलबीएस कॉलेज, अशा पदयात्रा होणार आहेत. पदयात्रांमध्ये महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
कोपरा सभाही होणार
पदयात्रांबरोबरच सायंकाळी 6 ते 8 आणि रात्री 8 ते 10 या वेळेत शहरात दोन्ही राजांच्या प्रचारासाठी कोपरा सभाही होणार आहेत. गुरुवार, दि. 3 पासून गुरुवार, दि. 17 पर्यंत (दि. 7 व दि. 8 वगळून) या सभा होणार आहेत. दि. 3 रोजी सायंकाळी 6 वाजता गुरुवार परज व रात्री 8 वाजता केसरकर पेठ (घोरपडे ऑफिसशेजारी) कोपरा सभा होणार असून नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.