बेनोनी (दक्षिण आफ्रिका) – आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) बलाढ्य ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना येथे होत आहे. या सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरी गाठण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. या दोन संघातील विजेत्या संघाशी भारतीय संघाचा येत्या रविवारी विजेतेपदासाठी सामना होणार आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा अत्यंत रंगतदार ठरलेल्या लढकीत २ गडी राखून पराभव केला होता. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ या स्पर्धेतही संभाव्य विजेताच मानला जात आहे. संघाने एकूण ९ वेळा तर सलग पाच वेळा अंतिम फेरी गाठली आहे.
The #U19WorldCup 2024 semi-final match-ups are now confirmed 🌟 pic.twitter.com/2qxBUso5d6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 3, 2024
आता कागदावरचे सुत्र पाहिले तर पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ जास्त भक्कम दिसत आहे. मात्र, या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने अनेकदा जायंट किलरची भूमीका वठवली आहे. त्यांनी सातत्याने बलाढ्य संघांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे अंतिम लढतही भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातच व्हावी अशी अपेक्षाही तमाम क्रिकेट चाहते करत आहेत.
#U19WorldCup2024 #INDvPAK : तर 18 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदासाठी होऊ शकतो महामुकाबला…
गट क्रमांक क मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत तर दुसरीकडे गट क्रमांक ड मध्ये पाकिस्ताननेही त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत. सुपर सिक्सच्या क्रमांक एक गटात भारतीय संघ अव्वल ठरला तर गट क्रमांक दोन मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल ठरला आहे. सुपर सिक्स एक क्रमांकाच्या गटातून भारत व पाकिस्तान हे उपांत्य फेरीत दाखल झाले तर गट क्रमांक दोनमधून ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका पात्र ठरले. पहिल्या उपांत्य लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली असून ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यातील विजेता अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.