राजस्थानमधील दोघा बदमाशांनी शेकडो पुणेकरांचे उतरवले कपडे; नग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन केले ब्लॅकमेल

पुणे,दि.10- पुणेकरांच्या बुध्दीमत्तेचे आणी हजरजबाबीपणाचे उदाहरण सर्वत्र दिले जाते. मात्र याच पुणेकरांना दोघा राजस्थानी भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढत रात्रीची झोप आणी जगणे हराम केले आहे. इतकेच नव्हेतर त्यांनी पुणेकरांच्या अंगावरील कपडे काढत तोंड दाखवायला देखील जागा ठेवली नाही.

आता हेच पुणेकर आबली अब्रु वाचवण्यासाठी सायबर सेलकडे धाव घेत आहेत. या भामट्यांनी जानेवारी 2021 पासून एक दोन नव्हे तर तब्बल 100 पुणेकरांच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडत त्याचे व्हिडिओ रेकॉडिंग केले आहे. ही संख्या यापेक्षाही जास्त असून लाजेखातर अनेक जण पुढे येण्यास तयार नाहीत.

पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी राजस्थानमधील दोन बदमाषांची ओळख पटवली आह. ज्यांनी जानेवारी महिण्यासपासून पुणे शहरातील 100 पुरुषांना ब्लॅकमेल केले होते. राजस्थान पोलिसांच्या ताब्यात असलेले हे दोघे पुरुषांशी मैत्री केल्यावर त्यांचे फोन नंबर सामायिक करायचे आणि पुरुषांना व्हिडिओ कॉलद्वारे नग्न होण्याची विनंती करत असत. यानंतर स्क्रीनवर व्हिडिओ रेकॉर्डर सॉफ्टवेअरद्वारे हे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले जात असत आणि पैशाची मागणी करुन ब्लॅकमेल केले जात होते.

पीडितांकडून तक्रारी येण्यास सुरवात झाल्यानंतर पोलिस उपायुक्त (सायबर) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक या प्रकरणांचा तपास करत आहे. राजस्थान पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्या ताब्यात घेऊ . आरोपी सध्या राजस्थानमधील डीगजवळील खोह पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहेत,अशी माहिती सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हाके यांनी दिली.

यावर्षी जानेवारीपासून शहरातील विविध भागांतील 100 जणांच्या तक्रारी सायबर सेलला आल्या आहेत. या तक्रारीपैकी आठ प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस पथकाने संशयितांनी वापरलेल्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या उपकरणांचे आयपी पत्ते तसेच संशयितांचे बॅंक खात्याचा तपशीलही शोधून काढला आहे.

सायबर पोलिसांच्या पथकाने दोन आठवड्यापुर्वा राजस्थानला भेट दिली आणि त्यांना समजले की राजस्थान पोलिसांनी तेथे याप्रकरणी दाखल केलेल्या अशाच प्रकारांमध्ये दोघेही आरोपी अटक आहेत.राजस्थानमधील या दोघांनी तक्रारदारांकडून 3000 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम उकळली आहे. पोलिसांकडे गेलेले सर्व पीडित खंडणी व धमकीच्या कॉलला कंटाळले होते. सर्व पीडितांचे वय 25 ते 55 वर्षे वयोगटातील आहे.

ब्लॅक मेल करत उकळले तीन ते 25 हजार 
हा गुन्हा कसा घडला आहे याविषयी माहिती देताना हाके म्हणाले,सुरुवातीला पीडितांना त्यांच्या सोशल नेटवर्किंग(फेसबुक) साइटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या दोघा आरोपींनी महिलांची नावे वापरुन सोशल मीडिया साइटवर बनावट प्रोफाइल तयार केले आहेत. त्यांनी प्रोफाईलला सुंदर स्त्रीचे प्रोफाइल चित्र अपलोड केले होते. या दोघांनी सोशल नेटवर्किंग साइटवर या आलेल्या विनंत्या स्वीकारल्या.

त्यानंतर दोघे मेसेंजरवर मुलगी असल्यचे भासवत संवाद साधतात काही दिवस गप्पा मारल्यानंतर मेसेंजरवरुन पिडीतांचा विश्‍वास संपादन करुन फोन नंबर मिळवला. फोन नंबर मिळाल्यानंतर या दोघांनी ध्वनी मॉड्युलेटिंग सॉफ्टवेअर वापरुन कॉल केले. ज्यामुळे पुरुषातला आवाज स्त्रीमध्ये बदलला. हे सॉफ्टवेअर वापरुन त्यांनी पिडीत पुरुषांशी गप्पा मारल्या.

या गप्पा भर रंगात आल्यावर आरोपींनी महिलांचे अगोदरच रेकॉर्ड केलेले व्हिडिओ चित्रीकरण प्ले केले. यामध्ये महिला स्वत: नग्न होऊन पिडीत पुरुषांनाही नग्न होण्याची विनंती करत होत्या. त्यांच्या लाडिक व सततच्या विनंतीला भुलून पिडीत पुरुषही नग्न होऊन चॅटींग करु लागले. जर व्हिडिओ कॉलवर पुरुष नग्न झाले तर ते दोघे स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डर सॉफ्टवेअरचा वापर करून हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत होते.

त्यानंतर या दोघांनी पीडितांना असे सांगितले की ते पीडितांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल मीडिया साइट किंवा अन्य वेबसाइटवर अपलोड करतील आणि त्यांच्या मित्रांना व्हिडिओमध्ये टॅग करतील. हे नको असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे धमकावत. त्यांच्या धमकिला घाबरुन काही पिडीत पुरुषांनी नेट-बॅंकिंग किंवा यूपीआय सेवा वापरुन पैसे हस्तांतरित केले. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये या दोघांची मागणी वाढत गेल्याने पिडीत पुरुषांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

“कोविड लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम अनेक कंपन्यांनी सुरु केल्याने पुरुष घरीच असतात आणि आरामात सोशल नेटवर्किंग साइट वापर करत असतात. ते सोशल मिडियाचा वापर सढळ हाताने करतात. अनोळखी व्यक्तींची रिक्वेस्ट स्विकारुन चॅटींग करणे, व्हिडिओ कॉल करणे, माहिती शेअर करत असतात. हे करत असताना ते कोणतीही खबरदारी घेत नाहीत. याचाच फायदा सायबर भामटे उचलतात.” – दगडू हाके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.