नवी दिल्ली : गुगलने पाकिस्तानच्या सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. गुगलने प्रसिद्ध केलेल्या या यादीत दोन भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या गुगल सर्चच्या टॉप-10 यादीत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि बॉलिवुडची अभिनेत्री सारा अलि खान यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
Abhinandan Varthaman, Sara Ali Khan among most-searched personalities in Pakistan
Read @ANI Story | https://t.co/WrH70E1Ar1 pic.twitter.com/kOmzTbqtg1
— ANI Digital (@ani_digital) December 11, 2019
‘गुगल ट्रेंड्स सर्च इन ईयर 2019’ या नावाने दरवर्षी गुगल ही यादी प्रसिद्ध करते. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान गूगलच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. सारा तिच्या चित्रपटांसाठी आणि अनोख्या फॅशन सेन्ससाठी परिचित आहे. 1995 च्या ‘कुली नंबर -1’ च्या कॉमेडी चित्रपटाच्या रिमेकमध्ये आणि इम्तियाज अलीच्या चित्रपटात सारा दिसू शकेल. साराचा पहिला चित्रपट केदारनाथ होता, त्यानंतर ती सिंबामध्येही दिसली.
विंग कमांडर अभिनंदन या यादीमध्ये नवव्या स्थानावर आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनंदन हे चर्चेत आले होता जेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या एफ -16 विमानात गोळी झाडली आणि त्यांचे विमान अपघात होऊन पाकिस्तान सीमेवर पोहोचले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना काही दिवस ताब्यात घेतले होते. दरम्यान, भारताच्या लढ्यानंतर त्यांची पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली त्याचवेळी त्यांचा शोध गुगलव्दारे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक शोधलेल्या शब्दांच्या आधारे ही यादी तयार केली गेली आहे. दरम्यान, यंदाच्या यादीत भारतातील रिऍलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस सीझन -13’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टीव्ही शो ‘मोटू पतलू ‘या यादीत आठव्या स्थानावर आहे.