सामाईक विहिरीवर सरपण टाकण्याच्या वादातून हाणामारी
नगर – शेतातील सामाईक विहिरीवर सरपण टाकण्याच्या कारणावरून दोन गटात लाकडी दांडके व दगडाने हाणामारी झाल्याची घटना टाकळी खातगाव येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अल्लाबक्ष अब्बास, शेख रमजान अल्लाबक्ष, शेख जुनेद रमजान, शेख शाकीरा रमजान (सर्व रा. टाकळी खातगाव) यांनी सद्दाम शेख लाल शेख व त्याचा भाऊ यांच्यात सामाईक असलेल्या विहिरीवर सरपण आणून टाकले.
या कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी सद्दाम शेख व शेख मजहरलाल यांना लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी सद्दाम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.