केंदूर – करंदी (ता. शिरूर) येथील युवक सौरभ भाऊसाहेब ढोकले याने नुकतीच भंडारा येथील वैनगंगा नदीच्या तीरावर झालेल्या राज्यस्तरीय नौका नयन स्पर्धेत यश संपादन करत दोन सुवर्ण व चार सिल्वर पदक पटकाविले आहेत.
सौरभ याने याअगोदर नौका नयनमध्ये 2016 मध्ये चार सिल्वर पदके तर 2017च्या राष्ट्रीय कनिष्ठ नौकानयन स्पर्धेत सुवर्ण पदक, महाराष्ट्र बेस्ट प्लेअर ऍवार्ड अशी अनेक बक्षिसे मिळविली आहेत.
त्याचबरोबर यावर्षी 12 ते 16 जानेवारीला भोपाळ येथे होणाऱ्या 30 व्या राष्ट्रीय वरिष्ठ नौकानयन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात नुकतीच निवड करण्यात आली आहे. अशी माहिती उद्योजक वैभव ढोकले यांनी दिली.