वंचितच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा थैमान सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात रोज नवनवीन घटना घडामोडी घडत आहेत. त्यातच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. दोन माजी आमदारांनी वचिंत बहुजन आघाडी पक्षाचा  राजीनामा दिला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.


मंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशाने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ  उडाली आहे.  यावेळी शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती.

राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल माध्यमांवरून दिली. या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले जातेय. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाल्यामुळेच ३१ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतील वादासंदर्भात कार्यकर्त्यांवर कारवाईचा बगडा उभारणारे पत्र काढण्याची आल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.