नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट करणे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुखांना चांगलेच महागात पडले आहे. कारण आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा एफआयआर नोंदवला आहे. काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल रमेश यांनी अमित मालवीय यांच्या विरोधात बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या आधारे भाजप आयटी सेलचे प्रमुख असलेल्या मालवीय यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ए, १२०बी, ५०५(२), ३४ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.