मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शनिवारी (24 डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसलं तरी तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार ‘शीजान खान’ला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र, आता आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शीजान मोहम्मद खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिकारी त्याची कसून चौकशी करत असून, अभिनेत्यानं यावेळी एक मोठा खुलासा केला आहे.
TV actor Tunisha Sharma death case: Tunisha Sharma’s co-star & accused Sheezan Khan sent to 4-day police custody by Vasai court in Mumbai. pic.twitter.com/0y55NcQ2LC
— ANI (@ANI) December 25, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शीजान मोहम्मद खान यानं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, ‘तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी शीजाननं तिला वाचवलं. शीजाननं याविषयी तिच्या आईलाही सांगितलं होतं.” असं तो म्हणाला आहे. यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.