कॅलिफोर्निया – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसाठी धोका आहेत, अशा शब्दांमध्ये अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा आपला प्रचार बायडेन यांनी आज सुरू केला.
बायडेन यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटलचा बचाव करणाऱ्या १२ लोकांना अमेरिकेचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान केला. कॅपिटल हिलवरील आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्याच्या तिसऱ्या स्मृतिदिनानंतर बायडेन यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकेने जवळपास आपले सर्वस्व गमावले होते. या हल्ल्यामुळे शांततेने सत्ता हस्तांतरण प्रक्रीया पहिल्यांदाच खंडीत झाली.
संसदेत झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यचा जीव जाण्याला केवळ ट्रम्प हे एकटेच जबाबदार आहेत. त्यामुळे व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प अध्यक्ष म्हणून आल्यास देशाला धोका असेल, असे बायडेन म्हणाले.